Nisargnaad Trekker Testimonials: Chandangad Vandangad

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,

नुकताच साताऱ्याजवळ चंदन ट्रेक केला…नेहमीप्रमाणे सुंदर अनुभव…

ट्रेक-गिर्यारोहण म्हणजे काय? डोंगरावर, पर्वतावर केलेली चढाई, साहस, अवघड पॅच यशस्वीपणे पार पाडणे…यासोबतच डोंगर-दऱ्या, पर्वत नदी, झाडं, पानं, फुलं, दगड, माती, कातळ, प्राणी, पक्षी, कीटक आणि अशी सर्व संस्था एक्सप्लोर करणं…आता माझ्यासाठी ट्रेक केवळ endurance, फिटनेस, स्टॅमिना यासाठी नसून तर वरीलप्रमाणे एक्सप्लोर करण्यासाठी आहे. त्यामुळे मला माझ्या पेसने एक्सप्लोर करायला फार आवडतं आणि ते अनेकदा GGIM and GAF च्या वेळापत्रकानुसार जमतंही…यासोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रोजच्या जगण्यातून जरा उसंत मिळून या विश्वाकडे डोळे भरून बघता येतं… काही जाणून घेण्याचा प्रयत्न करता येतो…माझ्यासकट माती, वारा, पाणी, ढग, आकाश, दगडं, किल्ले, गड, विविध भूरचना, जैववैविध्य, आणि काय काय…जाणून घेता येतं, म्हणजे तसा प्रयत्न करता येतो…या विश्वाच्या पसाऱ्यात आपण कसे एक बिंदू आहोत हेही दिसतं-जाणवतं कारण नजर जाईल तिथपर्यंत आकाश, जमीन…असंच दिसत राहतं… without anything in between… कळत-नकळतपणे आपण हे सर्व absorb करत राहतो आणि तृप्त होत राहतो…आत, आतपर्यंत… आणि म्हणूनच हा अनुभव पुन्हा पुन्हा हवा असतो…त्यामुळेच पाय सारखे ट्रेककडे वळतात…खूप कष्ट पडतात परंतु त्यातून जे मिळतं-मिळत राहतं ते या कष्टाच्या कितीतरी पटीने अधिक आहे…जे डोळ्यांना दिसतं, अनुभवता येतं ते शब्दात वर्णन करणं कठीण आहे, कुठल्या कॅमेरात कैद करणं ही शक्य नाही…बस, अनुभवणं गरजेचं, पुन्हा पुन्हा अनुभवणं आवश्यक…

या नितांत सुंदर अनुभवासाठी #GGIM टीमचे मनापासून आभार,

#Pramila Pote #Ashish Nawandhar

Chandan trek, Satara

Amazing monsoon trek

07/07/2024

#ggim #trekkingindia #trek #ट्रेक #trek #sahyadritrekkers #sahyadrimountains #sahyadri

ॲड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.com

https://www.facebook.com/छाया-चित्रण-A-Visual-Storyteller-111559728276175

Recent Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *